संजू सॅमसनने सावध खेळ करत केएल राहुल (21) याच्या साथीने प्रथम संघाचा स्कोअर बोर्ड पुढे नेला. यानंतर त्याने तिलक वर्मा (52) सोबत 136 चेंडूत 116 धावांची भागीदारी केली. संजू सॅमसनने संयम दाखवत 110 चेंडूत पहिले एकदिवसीय शतक झळकावले. तो 114 चेंडूत 108 धावा करून बाद झाला. या खेळीदरम्यान सॅमसनने 6 चौकार आणि 3 षटकार मारले.
संजू सॅमसनने 23 जुलै 2021 रोजी श्रीलंकेविरुद्ध वनडे पदार्पण केले होते. अनेकवेळा संघात आणि संघाबाहेर राहिल्यानंतर, अखेर 29 महिन्यांनंतर सॅमसनने पहिले आंतरराष्ट्रीय शतक झळकावले. सॅमसनने 16 एकदिवसीय सामन्यांच्या 14 डावांमध्ये 510 धावा केल्या आहेत. या काळात एक शतक आणि 3 अर्धशतकं झळकावली आहेत. सॅमसनने 19 जुलै 2015 रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. झिम्बाब्वे विरुद्ध पहिला T20I सामना खेळला.