भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चार कसोटी सामन्यांच्या मालिकेला गुरुवारपासून (9 फेब्रुवारी) सुरुवात झाली. नागपूरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर झालेल्या सामन्याच्या पहिल्या दिवशी टीम इंडियाच्या गोलंदाजांनी चमकदार कामगिरी केली. ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. भारताचा अनुभवी ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनने सामन्याच्या पहिल्या दिवशी एक मोठी कामगिरी केली. त्याने कसोटी कारकिर्दीत 450 बळी पूर्ण केले.