अखेर ठरलं! शुभम गिलच्या हाती गुजरातच्या कर्णधारपदाची धुरा

सोमवार, 27 नोव्हेंबर 2023 (20:45 IST)
या वर्षीच्या आयपीएल लिलावापूर्वी हार्दिक पांड्याला मुंबई इंडियन्समध्ये खरेदी केल्यानंतर शुभमन गिलची गुजरात टायटन्सचा कर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. टीम इंडियाचा युवा सलामीवीर फलंदाज शुभमन गिल गुजरातचा नवा कर्णधार असेल.गेल्या मोसमात रशीद खानकडे उपकर्णधारपद होते. गिलने आतापर्यंत ४५ फॉरमॅटमध्ये २११८ धावा केल्या आहेत. ज्यामध्ये त्याने ७ शतके आणि १० अर्धशतके ठोकली आहेत. वर्षभरात त्याची सरासरी ५०.४२ इतकी आहे.
 
यावर गिल म्हणाला, “गुजरात टायटन्सचे कर्णधारपद स्वीकारताना मला आनंद आणि अभिमान वाटत आहे. अशा उत्कृष्ट संघाचे नेतृत्व करण्यासाठी माझ्यावर विश्वास ठेवल्याबद्दल फ्रँचायझीचे आभार मानतो. आमच्याकडे दोन अपवादात्मक हंगाम आले आहेत. मी आमच्या रोमांचक क्रिकेट ब्रँडसह संघाचे नेतृत्व करण्यास उत्सुक आहे, असे गिलने सांगितले. दरम्यान आयपीएलमध्ये प्रवेश केल्यापासून जीटीच्या यशात त्याचा मोलाचा वाटा आहे. गेल्या मोसमात त्याने मुंबई इंडियन्स विरुद्ध ६० चेंडूत १२९ धावा ठोकल्या होत्या.
 
गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पंड्याने फ्रँचायझी सोडली आहे. हार्दिक २०२३ मध्ये संघात सामील झाला. पहिल्या दोन मोसमात तो संघाचा कर्णधार होता. पहिल्याच सत्रात संघाला विजेतेपद मिळवून दिले. यानंतर दुसऱ्या सत्रातही गुजरातने अंतिम फेरी गाठली मात्र तिसऱ्या सत्रापूर्वी हार्दिकने आपली जुनी टीम मुंबई इंडियन्समध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती