यालयात शपथ घेऊन खोटी माहिती देणे आणि न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी बीसीसीआयचे माजी अध्यक्ष आणि भाजपा खासदार अनुराग ठाकूर यांनी सर्वोच्च न्यायालयाची बिनशर्त माफी मागितली. अनुराग ठाकूर यांच्यावतीने सर्वोच्च न्यायालयात माफीनामा सादर करण्यात आला असून, न्यायालय शुक्रवारी त्यावर निर्णय घेणार आहे.
अनुराग ठाकूर यांनी न्यायालयात स्पष्ट शब्दात बिनशर्त माफीनामा सादर करवा, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने सात जुलै रोजी दिले होते. त्यानंतर आज ठाकूर यांच्याकडून माफीनामा सादर करण्यात आला. चुकीची माहिती आणि गैरसमजातून सर्वोच्च न्यायालयात खोटी माहिती दिली गेली. त्यासाठी मी कोणत्याही अटीविना माफी मागतो. मी न्यायालयाच्या प्रतिष्ठेला कधीच कमी समजलेले नाही, असे अनुराग ठाकूर यांनी सर्वोच्च न्यायालयात सादर करण्यात आलेल्या माफीनाम्यामध्ये म्हटले आहे.