संघात समतोल असण्यावर दिला भर

शुक्रवार, 24 जानेवारी 2020 (13:51 IST)
न्यूझीलंड विरुध्दच्या मालिकेत यश मिळविणसाठी भारतीय संघ समतोल ठेवण्यावर भर दिला असल्याचे कर्णधार विराट कोहली यांनी सांगितले.
 
सध्या भारताचा संघ न्यूझीलंड दौर्‍यावर आहे. 24 जानेवारीपासून भारत न्यूझीलंडविरूद्ध टी-20 क्रिकेट मालिका खेळणार आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय संघाने सराव केला. त्यानंतर कोहली याने पत्रकार परिषद घेऊन आपली मते मांडली.
 
राहुलने यष्टिरक्षक म्हणून ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या मालिकेत चांगली कामगिरी केली. राहुलच्या या कामगिरीमुळे आम्हाला नवा पर्याय मिळाला. आता आम्हाला अतिरिक्त फलंदाज खेळवून अधिक समतोल संघ खेळवण्याची संधी मिळू शकते. जर तो यष्टिरक्षक म्हणून अशीच चांगली कामगिरी करत राहिला, तर त्याला यष्टिरक्षणाची जबाबदारी का द्यायची नाही? काही काळ राहुलकडे यष्टिरक्षणाची जबाबदारी द्याला काहीच हरकत नाही, असे सांगत विराटने अप्रत्क्षपणे ऋषभच्या जागी भारताला उत्तम पर्याय सापडल्याचे संकेत दिले. बाकीच्या खेळाडूंचे काय असा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे. पण आमच्यासाठी संघातील समतोल महत्त्वाचा आहे, असेही तो म्हणाला.
 
शिखर धवनच्या दुखापतीमुळे आमच्या काही योजनांना आळा घालावा लागणार आहे. संघात एखादा अतिरिक्त खेळाडू घेऊन राहुलला पाचव्या सहाव्या क्रमांकावर फलंदाजीस पाठवावे असा आचा विचार आहे. त्या क्रमांकावर राहुलदेखील खुलून खेळतो. आमच्या संघात तळाला फलंदाजी करणारे खेळाडू आहेत. त्यामुळे आम्हाला संघ समतोल करण्याची  संधी आहे, असे विराट म्हणाला.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती