ऑक्सिजन सिलिंडरवाला नाद खुळा क्रिकेटर

मंगळवार, 8 ऑगस्ट 2023 (12:53 IST)
cricketer with oxygen cylinder खूप आजारी… श्वास घ्यायला त्रास, डॉक्टरांनी आयुर्मानही एक वर्ष ठरवून दिले होते. असे असूनही हिमालयाएवढे धाडस आणि क्रिकेटची आवड एवढी होती की, पाठीवर ऑक्सिजन सिलेंडर बांधून क्रिकेट खेळायला सुरुवात केली. ही गोष्ट आहे 83 वर्षीय अॅलेक्स स्टीलची, ज्यांचे ऑक्सिजन सिलेंडरसह विकेटकीपिंग करतानाचे फोटो व्हायरल होत आहेत. त्यांना आता एक वर्षाचा कालावधी शिल्लक असल्याचे तीन वर्षांपूर्वी सांगण्यात आले होते. अॅलेक्स फुफ्फुसाच्या गंभीर आजाराशी झुंज देत आहे. पण, 2023 मध्ये ते, तका स्थानिक क्लब सामन्यात त्याच्या पाठीवर ऑक्सिजन सिलेंडर घेऊन विकेटकीपिंग करताना दिसत आहे.
 
अॅलेक्स स्टीलने प्रथम श्रेणी क्रिकेट खेळले आहे. 1967 मध्ये त्यांनी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. आपल्या संघासाठी आठ सामने खेळल्यानंतर, स्टीलने काही काळ क्रिकेटमधून ब्रेक घेतला आणि नंतर 1977 मध्ये पुन्हा खेळायला आला. पुढील तीन वर्षांत त्याने आणखी तीन प्रथम श्रेणी सामने खेळले.
 
अॅलेक्स स्टीलने 14 प्रथम श्रेणी सामने खेळले
यष्टीरक्षक फलंदाज म्हणून, अॅलेक्सने 14 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 24.84 च्या सरासरीने 621 धावा केल्या आहेत. अॅलेक्सने 2 अर्धशतकेही झळकावली. त्याची सर्वोच्च धावसंख्या 97 आहे. अॅलेक्सने 11 झेल आणि दोन स्टंपिंगही घेतले. वयाच्या 83 व्या वर्षी, पाठीवर लटकलेल्या ऑक्सिजन सिलेंडरशी खेळण्याबद्दल ते म्हणाले, “मी आजाराचा अजिबात विचार करत नाही. सर्वात महत्वाची आपली वृत्ती आहे. मी अशा लोकांना ओळखतो ज्यांना काही वाईट घडले की स्वतःबद्दल वाईट वाटते. पण मला स्वतःला असे कधीच वाटले नाही. एका क्लब मॅचमध्ये मी 30 ओव्हर्सचे विकेटकीपिंग केले. मी याबद्दल रोमांचित आहे.
 
अॅलेक्स स्टीलला ज्या फुफ्फुसाच्या आजाराने ग्रासले आहे, त्यात फुफ्फुसाची क्षमता कालांतराने कमी होत जाते, त्यामुळे श्वास घेण्यास त्रास होतो. अॅलेक्सला श्वास घेण्यासही त्रास होत आहे. असे असूनही क्रिकेटची क्रेझ कमी झाली नाही आणि त्याच्यातील चैतन्यही कमी झाले नाही.त्याला यापुढेही क्रिकेट खेळायचे आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती