चेतेश्वर पुजाराने काउंटी क्रिकेटमधील तिसरे द्विशतक झळकावले, 108 वर्षांनंतर असे करणारा पहिला ससेक्स खेळाडू ठरला

गुरूवार, 21 जुलै 2022 (11:52 IST)
चेतेश्वर पुजाराने ससेक्सचा कर्णधार म्हणून आपल्या पहिल्याच सामन्यात द्विशतक झळकावून शानदार फॉर्म कायम ठेवत बुधवारी मिडलसेक्सविरुद्धच्या कौंटी क्रिकेट सामन्यात आपली बाजू मजबूत स्थितीत आणली. काऊंटी क्रिकेटच्या चालू हंगामातील पुजाराचे हे तिसरे द्विशतक आहे. यासह, तो 108 वर्षांनंतर ससेक्ससाठी एका हंगामात तीन द्विशतके करणारा पहिला खेळाडू ठरला आहे. ससेक्सकडून खेळताना पुजाराने या मोसमात 7 सामन्यात 950 हून अधिक धावा केल्या आहेत.
 
टॉम हेन्सच्या दुखापतीमुळे पुजाराकडे ससेक्सचे कर्णधारपद सोपवण्यात आले. भारतीय कसोटी संघाचा महत्त्वाचा सदस्य असलेल्या पुजाराचे या मोसमातील सात काऊंटी सामन्यांमधील हे तिसरे द्विशतक आहे. यापूर्वी त्याने नाबाद 201 आणि 203 धावा केल्या आहेत. चेतेश्वर पुजाराने मिडलसेक्सविरुद्ध 368 चेंडूंचा सामना केला आणि 19 चौकार आणि 2 षटकारांसह 200 धावा पूर्ण केल्या.
 
काऊंटी क्रिकेटमधील दमदार कामगिरीमुळे भारतीय संघात स्थान मिळवणारा चेतेश्वर पुजारा इंग्लंडविरुद्ध पुन्हा नियोजित कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात केवळ 13 धावाच करू शकला. मात्र, दुसऱ्या डावात त्याने अर्धशतक झळकावले. त्याने 168 चेंडूत 66 धावा केल्या, त्यानंतर तो पुन्हा एकदा त्याच्या काउंटी संघ ससेक्समध्ये सामील झाला आणि पहिल्या सामन्यात तो 46 धावांवर बाद झाला.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती