धोनीच्या ट्विटरवरून ब्लू टिक गायब, सात महिन्यांपासून ट्विट केले नाही

शुक्रवार, 6 ऑगस्ट 2021 (16:15 IST)
भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार एमएस धोनीच्या खात्यातून ट्विटरने ब्लू टिक काढून टाकली आहे. त्याचे सुमारे 8.2 मिलियन फॉलोअर आहेत. धोनी ट्विटरवर कमी सक्रिय असल्याची अटकळ आहे, त्यामुळे ट्विटरने त्याच्या अकाऊंटमधून ब्लू टिक काढून टाकली आहे.
 
एमएस धोनीने यावर्षी 8 जानेवारी रोजी शेवटचे ट्विट केले होते. तेव्हापासून त्याने ट्विट केलेले नाही. मात्र, तो इन्स्टाग्रामवर अॅक्टिव्ह राहतो. मागच्या वर्षी 15 ऑगस्टला धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. सोशल मीडियाच्या माध्यमातूनच धोनीने आपण निवृत्ती घेत असल्याचं सांगितलं होतं.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती