WPL 2025 :14 फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. यावेळी स्पर्धेचे सामने देशातील 4 शहरांमध्ये खेळवले जातील, जिथे पाच संघ जेतेपदासाठी स्पर्धा करताना दिसतील. आता, महिला प्रीमियर लीग सुरू होण्यापूर्वीच, मुंबई इंडियन्सची स्टार अष्टपैलू पूजा वस्त्रकर दुखापतीमुळे संपूर्ण आगामी हंगामातून बाहेर पडली आहे आणि तिच्या जागी खेळाडूची घोषणा करण्यात आली आहे.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने दुखापतग्रस्त फिरकी गोलंदाज आशा शोभनाच्या जागी यष्टीरक्षक-फलंदाज नुझहत परवीनचा त्यांच्या संघात समावेश केला आहे. शोभनाने गेल्या हंगामात शानदार कामगिरी केली होती आणि 10 सामन्यांत 7.11 च्या इकॉनॉमी रेटने 12 विकेट्स घेऊन संघाला विजेतेपद जिंकून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. यामुळेच ती भारतीय संघात स्थान मिळवण्यात यशस्वी झाली.