झम्पा आयपीएलचा पहिला सामना मुकणार

गुरूवार, 25 मार्च 2021 (11:22 IST)
आयपीएलचे चौदावे पर्व काही दिवसांवर येऊन ठेपले आहे. तत्पूर्वी, बंगळुरु संघाला मोठा धक्का बसला आहे. संघाचा फिरकीपटू अॅडम झम्पा पहिल्या सामन्याला मुकणार आहे. 
 
ऑस्ट्रेलियाचा लेगस्पिनर व आयपीएलमध्ये बंगळुरु संघाकडून खेळणारा झम्पा आपल्या लग्नामुळे हा सामना खेळणार नसल्याचे बंगळुरुचे क्रिकेट संचालक माइक हेसन यांनी सांगितले.
 
फ्रेंचायझीच्या ट्विटर हँडलवर व्हिडिओ पोस्ट करत त्यांनी ही माहिती दिली. हेसन म्हणाले पहिल्या सामन्यासाठी सर्व विदेशी खेळाडू उपलब्ध होणार नाही. झम्पा लग्न करणार आहे. फ्रेंचायझीला त्याच्याविषयी माहिती होती. जेव्हा तो संघात सामील होईल तेव्हा तो या स्पर्धेत योगदान देईल.

वेबदुनिया वर वाचा