भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी अडचणीत सापडला आहे. माजी व्यावसायिक भागीदार मिहिर दिवाकर आणि त्याची पत्नी सौम्या दास यांनी धोनीविरुद्ध दिल्ली उच्च न्यायालयात मानहानीचा दावा दाखल केला आहे. दिवाकर आणि दास यांनी धोनी आणि त्याच्या वतीने काम करणाऱ्या लोकांना 2017 च्या कराराच्या कथित उल्लंघनाच्या संदर्भात त्यांच्यावर बदनामीकारक आरोप करण्यापासून रोखण्यासाठी निर्देश मागितले आहेत.
याआधी धोनीने त्याच्या दोन जुन्या व्यावसायिक भागीदारांवर फसवणुकीचा आरोप केला होता. धोनीने तक्रारीत लिहिले होते की, त्याला क्रिकेट अकादमी उघडण्याचे कंत्राट मिळणार होते, परंतु ते त्याला दिले गेले नाही आणि त्याचे 15 कोटी रुपये हडप करण्यात आले.