‘वानखेडे’वर शाहरूख अखेर ‘एन्ट्री’

सोमवार, 3 ऑगस्ट 2015 (11:30 IST)
मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या नियंत्रणाखाली असलेल्या या वानखेडे स्टेडियमवर प्रवेश करण्यास शाहरूखला परवानगी देण्यात आली आहे. त्याला पाच वर्षांसाठी मनाई केली होती. मात्र एमसीएने दोन वर्षे आधीच ही बंदी मागे घेतली.

वानखेडेवरील सुरक्षारक्षकासोबत वाद घातल्याप्रकरणी दिवंगत विलासराव देशमुख यांच्या अध्यक्षतेखालील एमसीएच्या समितीने १८ मे २०१२ रोजी शाहरूखवर वानखेडे स्टेडियम व परिसरामध्ये प्रवेश करण्यावर पाच वर्षांची बंदी घालण्यात आली होती. रविवारी झालेल्या एमसीएच्या बैठकीमध्ये ही बंदी उठविण्यात आल्याचे एमसीए उपाध्यक्ष आशिष शेलार यांनी सांगितले.

वेबदुनिया वर वाचा