सामना अनिर्णीत, भारताने मालिका जिंकली!

वेबदुनिया

सोमवार, 11 जुलै 2011 (12:36 IST)
चंदरपॉलच्या शतकाच्या जोरावर विंडीजने भारतापुढे सामना जिंकण्यासाठी १८० धावांचे आव्हान ठेवले होते. सामन्याच्या अखेरच्या दिवशी चहापानापर्यंत भारताच्या तीन बाद ९४ धावा झाल्या होत्या. यानंतर पंचांनी हा सामना अनिर्णीत झाल्याचे घोषित केले.

तत्पूर्वी, दुसऱ्या डावामध्ये विंडीजने ३३२ धावा केल्या. चंदरपॉल याने नाबाद ११६ धावा काढत फिडेल एडवर्डस (३० धावा) याच्या साथीने ६५ धावांची भागीदारी केली. यानंतर गोलंदाजी करताना फिडेल एडवर्डस याने पहिल्याच चेंडुवर भारताचा सलामीवीर अभिनव मुकुंद याला पायचीत केले. मुरली विजय (४५ धावा) आणि सुरेश रैना (८ धावा) यांना रवी रामपॉल याने बाद केल्यानंतर सामना अनिर्णीत राहिल्याचे घोषित करण्यात आले. याबरोबरच भारताने ही मालिका १-० अशी जिंकली आहे.

वेबदुनिया वर वाचा