क्रिकेटमधून निवृत्त झालेला मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आयपीएलमध्ये दिसणार आहे. दचकलात ना. सचिन मैदानावर खेळणार नाही तर इंडियन प्रिमीअर लीगच्या सातव्या सीझनमध्ये प्रमोशन करताना दिसणार आहे. 'आयपीएल'च्या सहाव्या मोसमात मुंबई इंडियन्सतर्फे खेळणारा सचिन आतापर्यंत आपल्याच संघाला प्रमोट करत होता. पण आता तो आयपीएलला प्रमोट करणार आहे.