सचिनच्या उपस्थितीचा फायदा : हरभजन

वेबदुनिया

सोमवार, 26 सप्टेंबर 2011 (12:15 IST)
सचिन तेंडुलकर प्रत्यक्ष खेळला नसला तरी स्टेयिडमवरील त्याच्या नुसत्या उपस्थितीने आमचे मनोधैर्य उंचावले, असे मुंबई इंडियन्सचा प्रभारी कर्णधार हरभजनसिंगने म्हटले आहे. जेव्हा जेव्हा गरज होती. तेव्हा तेव्हा सचिन आम्हाला संदेश पाठवित होता. खरं सांगायचे तर सचिन, रोहित शर्मा आणि मुनाफसारख्या खेळाडूंशिवाय खेळताना आम्हाला कठीन जात असल्याची कबुलीही भज्जीने दिली. पायाच्या बोटांना झालेल्या दुखापतीमुळे सचिन यंदा चॅम्पियन लीगमध्य खेळणार नाही.

चेन्नईविरुद्ध अत्यंत दबावात मलिंगाने केलेल्या फलंदाजीचे भज्जीने तोंड भरून कौतुक केले. फलंदाज म्हणून आपण महत्त्वाची जबाबदारी पार पाडू शकतो हेच मलिंगाने या खेळीतून सिद्ध केल्याचे भज्जी म्हणाला.

वेबदुनिया वर वाचा