विराट विश्व एकादशमध्ये एकटा भारतीय

सोमवार, 8 ऑक्टोबर 2012 (16:25 IST)
FILE
आयसीसीच्या टी-२० विश्व एकादश संघात विराट कोहलीच्या रूपात फक्त एकाच भारतीय क्रिकेटपटूस स्थान मिळाले आहे.

या संघात टी-२० विश्वविजेता वेस्ट इंडिज आणि श्रीलंकेच्या खेळाडूंची भरमार आहे. कोहलीने या करंडकात ५ सामन्यातून १८५ धावा केल्या.

श्रीलंकेचा महेला जयवर्धने या संघाचा कर्णधार असून विंडीज व श्रीलंकेच्या एकून ५ खेळाडूंच्या यामध्ये समावेश आहे.

श्रीलंकन परिस्थितीत सर्वोत्तम संघ निवडीचे उद्दिष्ट ठेवून स्पर्धेतील कामगिरीच्या आधारावर हा संघ निवडण्यात आला आहे.

वेबदुनिया वर वाचा