विराट मोबाईल गेम लॉन्च

बुधवार, 16 डिसेंबर 2015 (10:30 IST)
मुंबई- भारतीय क्रिकेट संघाचा कसोटी कर्णधार विराट कोहली सोबत आता तुम्हाला खेळता येणार आहे? कारण विराट क्रिकेट नावाचं गेम अॅप लॉन्च झाले आहे. नजारा या मोबाइल अॅप तयार करणार्‍या कंपनीने टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीचं मोबाईल अॅप तयार केलं आहे. हे अॅप गूगल प्ले स्टोअरवरून मोफत डाउनलोड करता येणार आहे. या अॅपमध्ये विराटचं 2 डी ग्राफिक्स तयार करण्यात आलं असून विराटच्या फलंदाजीची शैली यात उतरवण्याचा प्रयत्न करण्‍यात आला आहे. 
 
क्रिकेट स्टेडियम, स्कोअर बोर्ड, क्रिकेट रसिक असं परिपूर्ण या मोबाईल गेम अॅपमध्ये आहे. हे अॅप 7 डिसेंबरला अपडेट झालं असून 10 एमबी एवढी या मोबाईल अॅपची साइज आहे.

वेबदुनिया वर वाचा