मला ब्लॅकमेल करण्यात आले : हमीद

मंगळवार, 7 सप्टेंबर 2010 (11:50 IST)
मॅच फिक्सिंगचे आरोप केल्यानंतर पाकिस्तानचा सलामी फलंदाज यासिर हमीदने आपल्याला ब्लॅकमेल करण्यात आल्याचा आरोप केला. 'न्यूज ऑफ द वर्ल्ड'च्या दुसऱ्या स्टिंग ऑपरेशनमध्ये पाकचे खेळाडू जवळपास सर्वच सामने फिक्स करीत असतात, असा आरोप करून आसिफने काल बॉम्बगोळा टाकला होता. हा आरोप करून काही तास उलटत नाहीत तोच त्याने आपण असे काहीही बोललो नसल्याचे सांगून सारवासारव केली होती. आज त्याने या प्रकरणातील गुंता वाढवत आपल्याला सहकाऱ्यांवर आरोप करण्यासाठी ब्लॅकमेल करण्यात आल्याचा दुसरा यू टर्न घेतला.

वेबदुनिया वर वाचा