मनोहर यांचा बीसीसीआय अध्यक्षपदाचा राजीनामा

मुंबई- भारतीय नियामक ‍मंडळाचे अध्यक्ष शशांक मनोहर यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. ऑक्टोंबर २०१५ मध्ये जगमोहन दालमिया यांचे निधन झाल्यानंतर त्यांनी बीसीसीआयच्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली होती.
 
आयसीसीच्या प्रमुखपदासाठी मनोहर यांचे नाव शर्यतीत असल्याने त्यांनी पद सोडल्याची चर्चा आहे. आयसीसीच्या अध्यक्षपदावर असताना देशाच्या क्रिकेट संघटनेचे अध्यक्षपद भूषवात येत नाही
 
सर्वोच्च न्यायालयाने नेमलेल्या लोढा समितीने स्वच्छ पारदर्शक कारभारासाठी अनेक शिफारसी केल्या आहेत. राजीनामा देण्यापूर्वी शशांक मनोहर यांनी अन्य बीसीसीआय सदस्यांशी चर्चा केली होती. मनोहर यांच्यानंतर आता या पदासाठी शरद पवार यांचे नाव चर्चेत आहे. 
 
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार मुंबई क्रिकेट असोशिएशनचे अध्यक्ष आहेत. मनोहर शरद पवार यांच्या निकटवर्तीय वर्तुळातील आहेत. बीसीसीआयचे सचिव अनुराग ठाकूर, अजय शिर्के आणि राजीव शुक्ला यांची नावेही अध्यक्षपदासाठी चर्चेत आहेत.

वेबदुनिया वर वाचा