भारत-पाक क्रिकेट सामने व्हावेत: द्रविड

शनिवार, 16 मे 2015 (11:57 IST)
मुंबई। क्रिकेटच्या दृष्टिकोनातून विचार केल्यास भारत आणि पाकिस्तान या परंपरागत प्रतिस्पर्ध्यांमध्ये क्रिकेट सामने व्हावेत, असे मत भारताचा माजी कर्णधार राहुल द्रविड ने व्यक्त केले आहे.
 
त्रयस्थ ठिकाणी पाकिस्तानसोबत मालिका खेळण्यासाठी भारतीय संघाला केंद्र सरकारने परवानगी दिल्याचे वृत्त आहे. त्यावर राहुलने आपली भूमिका स्पष्ट केली. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील लढतीने अवघे क्रिकेटविश्व ढवळून निघते. त्यामुळे क्रिकेटचा विचार करता दोन्ही देशांदरम्यान समाने झाले तर त्याचे स्वागतच करायला हवे, मात्र उभय संघातील क्रिकेट मालिकेला क्रिकेटव्यतिरक्ति अनेक कंगोरे आहेत.
 
पाकिस्तानमधील ढासळलेली कायदा आणि सुव्यवस्था तसेच दोन्ही देशांमधील बिघडलेले राजकीय संबंध पाहता भारत-पाकमध्ये पुन्हा क्रिकेट सामने होण्याबाबतचा निर्णय उभय देशांची क्रिकेट बोर्ड आणि सरकार यांच्यावरच सोडायला हवा, असे राहुलने सांगितले.

वेबदुनिया वर वाचा