भज्जीच्या आईच्या मते 'सत्याचा विजय'

भाषा

मंगळवार, 29 जानेवारी 2008 (18:23 IST)
वर्णद्वेषाच्या आरोपातून हरभजन निर्दोष सुटल्यानंतर 'मला माहीत होतं, तो निर्दोष सुटेल' अशी प्रतिक्रिया त्याची आई अवतार कौर यांनी व्यक्त केली आहे.

एकीकडे हरभजनप्रकरणाची सुनावणी सुरू असताना हरभजनची आई या जालंधरमध्ये गुरुद्वारात प्रार्थना करीत होत्या. हरभजन निर्दोष सुटला हा सत्याचा विजय असून, आपल्याला याची खात्री होती असे त्यांनी सांगितले.

भारतीय खेळाडूंनी हरभजनला दिलेली साथ आपण आयुष्यभर विसरू शकणार नसल्याचे त्या म्हणाल्या.

वेबदुनिया वर वाचा