बाऊंसर बॉल लागल्याने ऑस्ट्रेलियाचा ह्युजेस कोमात (पाहा व्हिडिओ)

बुधवार, 26 नोव्हेंबर 2014 (11:27 IST)
ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा धडकाकेबाज फलंदाज फिल ह्युजेस यांच्या डोक्यावर बॉल आदळल्याने तो मैदानावरच कोसळला. हेल्मेट असतानाही ह्युजेसला गंभीर दुखापत झाली आहे. तो कोमात गेला असून त्याच्यावर तातडीने शस्त्रक्रिया करण्यात आली. 
 
भारतविरूद्ध कसोटी क्रिकेट मालिकेसाठी ऑस्ट्रेलियन संघ सज्ज होता. सिडनी क्रिकेट ग्राउंडवर शेफिल्ड शिल्ड स्पर्धेदरम्यान, ऑस्ट्रेलियने फलंदाज फिल ह्युजेस यांच्या डोक्यावर बॉल बसला. त्याचवेळी तो मैदानावरच कोसळला. गंभीर जखमी ह्युजेसच्या डोक्यावरनं शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. मात्र, तो कोमात गेल्याचे वैदकीय सूत्रांनी सांगितले. या घटनेमुळे ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का बसला आहे.
 
ह्युजेस हेल्मेट घालूनच खेळत होता. त्यामुळे बाऊंसर बॉल थेट त्याच्या डोक्यावर आदळला नसला तरी वेगवान बॉलने डोक्याला मार बसला. तो खाली पडला त्याचवेळी बेशुद्धावस्थेत गेला. त्याच्या उपचारासाठी तीन अॅम्ब्युलन्स आणि एअर अॅम्ब्युलन्स मैदानावर दाखल झाल्या. त्याची तब्येत नाजूक असून पुढील 24 ते 48 तास काळजीचे असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. 
पाहा व्हिडिओ 
 

वेबदुनिया वर वाचा