धोनीचा डबल धमाका

WD
कांगारू गोलंदाजांची मनसोक्त धुलाई करून कर्णधार महेंद्रसिंग धोनीने कारकीर्दीतील पहिले द्विशतक आणि सहावे शतक साजरे केले. विराट कोहलीनेही 107 धावा ठोकल्या या बळावर टीम इंडियाने पहिल्या कसोटीत तिसर्‍या दिवस अखेर 5 बाद 515 अशी भक्कम मजल मारून 135 धावांची आघाडीदेखील घेतली.

243 चेंडू खेळताना धोनीने 22 चौकार आणि 5 गगनचुंबी षटकारांसह नाबाद 206 धावा ठोकल्या आहेत.

धोनीनी विराटसह पाचव्या विकेटसाठी 128, तर भुवनेश्वर कुमारसह नवव्या विकेटसाठी 109 धावांची भागीदारी केली.

यादरम्यान धोनीने कसोटी कारकीर्दीतील 4 हजार धावांचा टप्पाही पूर्ण केला.

वेबदुनिया वर वाचा