भारत, श्रीलंका आणि न्यूझीलंड दरम्यान होणार्या तिरंगी मालिकेसाठी लंकेन चॅम्पियन करंडकमधील संघ कायम ठेवला आहे. या संघात मलिंगा बंडारा वगळता चॅम्पियन करंडकमधील संघ जसाचा तसा आहे.
श्रीलंकेचा पहिला सामना मंगळवारी (ता.आठ) न्यूझीलंडविरुद्ध होणार आहे. मालिकेतील अंतिम सामना 14 सप्टेंबर रोजी होईल. मालिकेसाठी निवडलेला श्रीलंकेचा संघ पुढील प्रमाणे... कुमार संगकारा (कर्णधार) , मुथ्थया मुरलीधरन , सनथ जयसूर्या , महेला जयवर्द्धने , तिलकरत्ने दिलशान , उपुल तरंगा, तिलन समरवीरा , चमारा कपूगेदरा, तिलन कंदाम्बी, एंजेलो मैथ्यूज, धम्मिका प्रसाद , अजंता मेंडिस , लसिथ मलिंगा , तिलन तुषारा, नुवान कुलशेखरा आणि मलिंगा बंडारा.