टी-20: भारताचा पराभव

शनिवार, 3 ऑक्टोबर 2015 (10:49 IST)
धर्मशाला- शुक्रवारी झालेल्या पहिल्या टी-20 सामन्यात दक्षिण आफ्रिकेसमोर भारताला सात गडी राखून पराभवच स्वीकारावा लागला.
 
आफ्रिकेचे आघाडीचे तीन फलंदाज 95 धावांत परतले. त्या वेळी आफ्रिकेसमोरील लक्ष्य अधिकच अवघड झाले; पण जेपी ड्युमिनी याने फरहान बेहार्डिन याच्यासह आक्रमक शतकी भागीदारी करीत दक्षिण आफ्रिकेला भारत दौऱ्याची विजयी सुरवात करून दिली. 
 
रोहितच्या धडाकेबाज शतकाने भारताने दक्षिण आफ्रिकेसमोर आव्हान दिले. शिखर धवनला धावचीत केलेल्या रोहित शर्माने याची पुरेपूर भरपाई करताना भारत किमान द्विशतकी मजल मारणार हे निश्चित केले. त्याने 39 चेंडूंत अर्धशतक, तसेच 61 चेंडूंत शतक करताना आफ्रिका गोलंदाजांना स्थिरावूच दिले नाही. विराट कोहलीसारखा आक्रमक सहकारी असूनही दोघांच्या शतकी भागीदारीत विराटचा वाटा 36 धावांचाच होता. 
 
रोहित बाद झाल्यानंतरच्या चार षटकांत पुरेशा विकेट असूनही 37 धावाच झाल्या. याचा फटका अखेरीस भारतास बसला. पण मुख्य म्हणजे विराट कोहलीने ट्‌वेंटी-20 मधील एक हजार धावा पूर्ण केल्या.

वेबदुनिया वर वाचा