जयवर्धने कसोटीतून निवृत्त

मंगळवार, 15 जुलै 2014 (11:44 IST)
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील तंत्रशुद्ध फलंदाज, श्रीलंकेचा माजी कर्णधार महेला जयवर्धने याने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे.

दक्षिण आफ्रिकेविरुद्धची दोन कसोटी सामन्याची मालिका आणि ऑगस्टमधील पाकिस्तानविरुद्धची दोन कसोटी सामने खेळून तो कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होणार आहे.

18 वर्षे श्रीलंकेचे प्रतिनिधित्व केल्यानंतर निवृत्तीचा निर्णय घेणे खूप कठीण होते; परंतु हीच थांबायची वेळ योग्य आहे, असे मला वाटते असे तो म्हणाला. यापुढे एकदिवसीय क्रिकेट मात्र खेळत राहणार आहे असे त्याने स्पष्ट केले.

जयवर्धनेने भारताविरुद्ध ऑगस्ट 1997 मध्ये कसोटी क्रिकेटची कारकिर्द सुरू केली. त्याने 66 धावांचे योगदान दिले. श्रीलंकेच्या कर्णधारपदाची जबाबदारी त्याने सांभाळली. जयवर्धनेने 145 कसोटी सामन्यात 50.18 च्या सरासरीने 11 हजार 493 धावा 33 शतकासह केल्या.

वेबदुनिया वर वाचा