खासदार सचिनचा क्रीडाविकास आराखडा

मंगळवार, 9 ऑक्टोबर 2012 (16:09 IST)
FILE
सचिन तेंडुलकरने निवृत्तीचे संकेत दिल्यानंतर खासदारकीच्या इनिंगची झोकात सुरुवात केली. क्रिकेटपुरते मर्यादित न राहता त्याने देशातील क्रीडाक्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठीचा आराखडाच केंद्रीय मंत्र्यांना सादर केला आहे.

खेळाचा शिक्षण व्यवस्थेत अंर्तभाव करून देशात क्रीडा संस्कृती निर्माण करण्यात यावी, अशी त्याची सूचना आहे.

केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री कपिल सिब्बल यांना त्याने सादर केलेला आराखडा पसंतीस पडला असून विस्तृत विचारविमर्शासाठी सचिनला निमंत्रित केले आहे. यानंतर तो सविस्तर सादरीकरण करेल.

यामधून धोरण आखून सीबीएसई व एनसीईआरटी यांना शालेय अभ्यासक्रमात खेळांचा अंतर्भाव करण्याबाबत सूचना करण्यात येईल, असे समजते.

वेबदुनिया वर वाचा