क्रिकेटला भारताची गरज- कास्प्रोविज

भाषा

सोमवार, 1 डिसेंबर 2008 (00:37 IST)
मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर भारतीय क्रिकेट धोक्यात आले असल्याचे म्हटले जात असले तरी जागतिक क्रिकेट भारताला सोडून पूर्ण होणार नाही, असे मत ऑस्‍ट्रेलियाचा माजी जलदगती गोलंदाज मायकल कास्प्रोविज यांनी व्यक्त केले आहे.

या हल्ल्यानंतर भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या एकदिवसीय मालिकेतील दोन सामने रद्द करण्यात आले. तर चॅम्पियन्स लीग ट्वेंटी-20 स्पर्धाही तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करावी लागली.

हे सर्व काही घडले असले तरीही भारतीय क्रिकेटपासून जग दूर राहू शकत, असे कास्प्रोविज यांना वाटते. म्हणूनच आंतरराष्‍ट्रीय क्रिकेट भारतीय क्रिकेटला दूर ठेवण्याची चुक करणार नाही.

वेबदुनिया वर वाचा