कोहलीच्या या कामाने मोदीपण झाले प्रसन्न

शनिवार, 8 ऑक्टोबर 2016 (11:14 IST)
भारत आणि न्यूझीलंडचा तिसरा कसोटी सामना इंदूरच्या होल्कर स्टेडियमध्ये खेळण्यात येत आहे. कसोटी अगोदर दोन्ही संघांनी मैदानावर फार घाम गाळला. या दरम्यान टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीच्या एका कामाने मोदींचा मान वाढवला आहे. विराट कोहलीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'स्वच्छ भारत मिशन'चे एक उदाहरण प्रस्तुत केले आहे.  
 
एबीपी न्यूजनुसार जेव्हा विराट कोहली अभ्यासादरम्यान रिकाम्या बाटल्या एकत्र करून डस्टबीनमध्ये टाकायला लागला. त्याला असे करताना बघून मैदानाचा सपोर्टिंग स्टाफ आला पण कोहली हे म्हणत त्यांना नाही सांगितले की ह्या बाटल्या त्यांनी फैलावल्या आहेत तर तेच गोळा करतील. विराट कोहलीने एकदा परत हे सिद्ध केले की तो क्रिकेटचे शानदार खेळाडू असून एक उत्तम भारतीय देखील आहे, जो आपले कर्तव्य कधी विसरत नाही. महत्त्वाचे म्हणजे कोलकाता टेस्टमध्ये टीम इंडियाच्या क्रिकेटरांनी ईडन गार्डनची स्वच्छता करून जनतेला 'स्वच्छतेचे संदेश' दिले होते. 
 
पंतप्रधानांनी केली प्रशंसा : एबीपीवर हा व्हिडिओ आल्यानंतर पंतप्रधानांनी फेसबुक वर विराट कोहलीच्या नावाने लिहिलेल्या एका संदेशात म्हटले की 'प्रिय, विराट कोहली, एबीपी न्यूजवर स्वच्छता मिशन आंदोलनाला बघितले. एक लहान पण शक्तिशाली संकेत जो प्रत्येकाला प्रेरित करेल.'   

वेबदुनिया वर वाचा