कुंबळे आयसीसी क्रिकेट समिती अध्यक्षपदी

गुरूवार, 11 ऑक्टोबर 2012 (18:29 IST)
PTI
माजी भारतीय क्रिकेटपटू अनिल कुंबळे यांची आज सर्वसंमतीने आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या क्रिकेट समितीचे अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. वेस्ट इंडिजते महान क्रिकेटपटू क्लाइव्ह लॉयड यांची जागा ते घेतील.

कार्यकारी मंडळाच्या बैठकीनंतर आयसीसीचे अध्यक्ष एलेन इसाक यांनी ही माहिती दिली. अनिल कुंबळे यांच्याकडे माजी भारतीय क्रिकेटपटू व कर्नाटक क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष म्हणून व्यापक अनुभव आहे, असेही त्यांनी नमूद केले.

वेबदुनिया वर वाचा