कुंबळेच्या फिरकीसमोर पाकची शरणागती

भाषा

गुरूवार, 22 नोव्हेंबर 2007 (16:27 IST)
कर्णधार अनिल कुंबळे व झहीर खानच्या अचूक मार्‍यासमोर पाक फलंदाजांनी शरणागती पत्करल्याने पहिल्या कसोटी सामन्यातील पहिल्या दिवशी चहापानापर्यंत पाकने एकशे बेचाळीस धावांच्या मोबदल्यात आठ गडी गमावले. सद्या मिसबाह-उल-हक (74) व मोहमद सामी (20) खेळपट्टीवर आहेत.

या दोघांदरम्यान 68 धावांची भागीदारी झाली असून 85 षटकात पाकचा धावफलक 210 पर्यंत नेण्यात त्यांनी मजल मारली आहे. कुंबळे (3/26) व झहीर खान (2/31) यांनी पाकची फलंदाजी कापून काढल्यानंतर मिसबाह-उल-हक व मोहमद सामी किल्ला लढवत आहेत. न्याहारी नंतर पाकने 74 धावांवरून डावाची सुरूवात केल्यानंतर पाकला मोहमद युसुफच्या रूपाने झटका बसला.

सौरव गांगुलीने त्यास 27 धावांवर पायचित केले. युसुफनंतर पाकचा किल्ला लढवण्यास आलेला कर्णधार शोएब मलिक खेळपट्टीवर फक्त अकरा चेंडूपर्यंतच टिकाव धरू शकला. मुनाफ पटेलने त्यास भोपळाही न फोडता तबुची वाट दाखवली. यामुळे पाकची आघाडीची पाकच्या संघावर 83 धावांत अर्धेअधिक फलंदाज गमावण्याची वेळ आली. मात्र, पडझडीनंतर मिसबाह व सामीने निकराची झुंज देऊन सन्मानजनक धावसंख्या उभारताना भारतीय फलंदाजांना जेरीस आणले आहे.

वेबदुनिया वर वाचा