कांगारू अडकले भारतीय फिरकीच्या जाळ्यात

शुक्रवार, 22 मार्च 2013 (17:01 IST)
भारतीय फिरकीपटूंनी कांगारूंना फिरकीच्या तालावर नाचवत दिल्ली कसोटीत पाहुण्यांना दिवसअखेर ८ गडी बाद २३१ धावांवर रोखले.

ऑस्ट्रेलियाकडून एड कोवान (३८), फिल हजेस (४५) आणि स्टिव्हन स्मिथ (४६) यांनी कडवी झुंज देत डावांस आकर देण्याचा प्रयत्न केला. इतर फलंदाजांनी शरणागती पत्करत टेस्ट संपण्याअगोदरच पराभव मान्य केल्याचे भासते आहे.

आर आश्विनने ४० धावांत ४ गडी बाद करत ऑस्ट्रेलियन फलंदाजीचे कंबरडे तोडले. रविंद्र जडेजाने महत्त्वपूर्ण टप्प्यावर ब्रेक देताना २ कांगारूंना तंबूत पाठवले. वेगवान ईशांत शर्माने घरच्या मैदानावर अप्रतिम मारा करताना ३५ धावांत २ बळी घेतले.

दिल्ली टेस्ट मधील सद्याची परिस्थिती व ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंची देहबोली बघितल्यावर भारत ४-० ने व्हाईट वॉश करण्याची सुवर्णसंधी चालून आली आहे.

ऑस्ट्रेलियाविरूद्ध कोणत्याही मालिकेत सलग चार टेस्ट जिंकण्याची भारताची ही पहिलीच वेळ असेल.

वेबदुनिया वर वाचा