कटकला दोन वर्षे सामनाच घेऊ नका: गावस्कर

बुधवार, 7 ऑक्टोबर 2015 (10:16 IST)
नवी दिल्ली- भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील ट्वेंटी- 20 सामन्यादरम्यान प्रेक्षकांच्या हुल्लडबाजीनंतर कटक येथील बाराबती स्टेडियमवर पुढील दोन वर्षे सामना घेऊ नका, असा सल्ला माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी दिला आहे.
 
भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दुसर्‍या लढतीसह टी- 20 सामान्यांची मालिका गमावली आहे. सामन्या दरम्यान चिडलेल्या प्रेक्षकांनी मैदानावर बाटल्या फेकत हुल्लडबाजीचे गालबोट लावले. स्टेडियम जवळपास निम्मे रिकामे झाल्यानंतर उर्वरित खेळ पूर्ण करण्यात आला आणि आफ्रिकेने चार फलंदाजांच्या मोबदल्यात 17 चेंडू राखून विजय मिळवला.
 
याविषयी बोलताना गावस्कर म्हणाले, की स्टेडियमवर उपस्थित असलेल्या पोलिसांनी काहीही कल्पना नव्हती. पोलिस सीमारेषेबाहेर उभे राहून सामना पाहत होते. त्याचवेळी हुल्लडबाज प्रेक्षकांनी बाटल्या फेण्यास सुरवात केली. कटल पुढील काही वर्षे सामना होवू नये आणि बीसीसीआयकडून ओडिशा क्रिकेट संघटनेला देण्यात येणार्‍या मानधनातून कपात करावी.

वेबदुनिया वर वाचा