बीसीसीआयला फटकारताना न्यायालयाने असे मत नोंदविले आहे की, गैरप्रकारामध्ये संघाच्या मालकाचा सहभाग असल्यास सबंधित संघाला अपात्र ठरवता येते, असा आयपीएलचा नियम आहे. मयप्पनचा फिक्सिंग प्रकरणात सहभाग असल्याचे स्पष्ट झाल्याने या संघाला खेळण्यास मनाई करावी, असे मत न्यायालयाने नोंदविल्याने सांगण्यात आले.