आयपीएलचे तिकीट दर कमी राहणार

शनिवार, 28 मार्च 2009 (19:14 IST)
इंडियन प्रीमियर लीगचा (आयपीएल) लाभ स्थानिक प्रेक्षकांना मिळण्यासाठी तिकीट दर कमी ठेवण्यात येणार असल्याचे आयपीएलचे अध्यक्ष ललीत मोदी यांनी सांगितले.

आफ्रिकेतील स्थानिक रेडिओला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले,' आयपीएलचे तिकीट आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या तिकीटांपेक्षा कमी किंमतीत मिळतील. परंतु देशातंर्गत सामन्यांच्या तिकीटांपेक्षा थोडी जास्त दर या तिकिटांचे असणार आहे. तिकिटांचे दर दोन ते 80 डॉलरच्या दरम्यान असतील. सामन्यांची तिकीट विक्री पुढील दोन दिवसात सुरु करण्यात येणार आहे.'

वेबदुनिया वर वाचा