रवींद्र महाजनींचा मृत्यू कशामुळे झाला?अभिनेता गश्मीरने सांगितलं

मंगळवार, 29 ऑगस्ट 2023 (20:09 IST)
रवींद्र महाजनी यांचा मृतदेह १५ जुलै रोजी पुणे जिल्ह्यातील आंबी गावातील अपार्टमेंटमध्ये आढळला होता. त्यांच्या निधनाचं कारण समोर आलं नव्हतं. ते एकटे राहत होते, त्यामुळे दोन दिवसांनी त्यांच्या मृत्यूची बातमी समोर आली होती. त्यांच्या निधनानंतर त्यांचा मुलगा व पत्नीवर टीका होत होती. आता त्यांचा मुलगा व अभिनेता गश्मीरने वडिलांच्या निधनाचं कारण ‘मित्र म्हणे’ या युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं आहे.
 
“त्यांचं निधन कार्डियाक अरेस्टने झालं होतं, डॉक्टरांनी सांगितलं की तुम्ही तिथे असता तरी काहीच करू शकला नसता,” असं गश्मीर महाजनीने सांगितलं. गेली २०-२५ वर्षे ते एकटेच राहत होते. आधी ते मुंबईला येऊन आमच्याबरोबर राहायचे, पण मागच्या साडेतीन वर्षांपासून त्यांनी सर्वांशी संपर्क कमी केला होता, असंही गश्मीरने नमूद केलं.

Edited By - Ratnadeep Ranshoor

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती