अभिनेत्री गौतमी आणि मृण्मयी देशपांडे यांचे आजोबा आणि ज्येष्ठ अभिनेते अरविंद काणे यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. गौतमी देशपांडे ने सोशल मीडियावर ही दुःखद बातमी दिली. गौतमीने आजोबांसाठी एक भावुक पोस्ट लिहिली आहे.
तिने लिहिले आहे, प्रिय आजोबा, पत्रास कारण की, आज तुमच्या आयुष्याच्या तिसऱ्या अंकाचा पडदा पडला ! आज माझ्या आजोबांची, आईच्या मामाचा बाबांची, आज्जीच्या प्रेमळ नवऱ्याची, उत्तम भावाची, आदर्श मुलाची अशा सगळया भूमिका असलेलं तुमच तीन अंकी नाटक इथेच संपलं.....