'यू नो व्हॉट' या कवितेचे गाण्यात रुपांतर न करता, त्याचे बोल उमेश आणि तेजश्रीकडून वदवून घेण्याची किमया सुश्रुत भागवतने लीलया साधली आहे. विशेष म्हणजे, यात उमेश कामतने गिटारदेखील वाजवली असून, कवितेचा विचार करून अद्वैतकडून गिटार चे प्रशिक्षण त्याने घेतले. अद्वैत पटवर्धन ह्यानी कवितेला पार्श्वसंगीत देताना गिटार च्या कॉर्डस वापरताना अश्या वापरल्या आहेत की ज्या उमेश कामत ला स्क्रीन वर लिलया वाजवता येतील. याबद्दल सांगताना दिग्दर्शक सुश्रुत भागवत सांगतात की, 'या कवितेच्या चित्रिकरणादरम्यान अद्वैत पूर्णवेळ सेटवर उपस्थित होता. पार्श्वसंगीताचा हा एक वेगळाच प्रकार असून, ब्लॅक एंड व्हाईटमध्ये ती लोकांसमोर सादर करण्यात आली आहे'. उमेशच्या कल्पनेतली तेजश्री दाखवणारी हि कविता, प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करत असून, अल्पावधीतच या कवितेने सोशल नेट्वर्किंग साईटवर तुफान प्रसिद्धी मिळवली आहे. येत्या ६ एप्रिल रोजी सर्वत्र प्रदर्शित होत असलेल्या या सिनेमात उमेश तेजश्री जोडीबरोबरच शर्वाणी पिल्लई हिचीदेखील विशेष भूमिका आहे.