टिप्स फिल्म्स मराठी सुपरस्टार निलू फुले यांच्या चारित्र्यावर चित्रपट बनवण्यासाठी तय्यार आहे.
शनिवार, 17 सप्टेंबर 2022 (15:30 IST)
टिप्स इंडस्ट्रीज मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज कलाकार निलू फुले यांच्यावर बायोपिक बनवणार आहे. ह्या चित्रपटामध्ये त्यांनी केलेला वैशिष्ट्यपूर्ण प्रवासाचे वर्णन केले आहे. एक अभिनेता आणि सामाजिक कार्यकर्ता हे दोन्ही कार्य त्यांनी कसे पार पडले हे या चित्रपटात दाखवण्यात आले आहे. त्यांनी आपल्या अभिनयाची सुरवात एका कथा अकलेच्या कांद्याची या मराठी लोकनाट्याने केली आणि पुढे मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय स्टार बनले. ल्युमिनरीने १३० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे आणि कुलीमध्ये अमिताभ बच्चन, वो ७ दिन मधील अनिल कपूर आणि मशालमध्ये दिलीप कुमार यांच्यासोबत हिंदी चित्रपटांमध्ये योगदान दिले आहे.
नकारात्मक भूमिकांसाठी ओळखल्या जाणारे निलू फुले आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये कसे होते हे पाहण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे. एका अभिनेत्याचे जीवन,त्यांच्या जीवनातील चढ-उतार आणि आवडलेल्या गोष्टीचा पाठपुरावा करण्यासाठी त्याने केलेले त्याग ह्या सर्व गोष्टी प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. आपल्या रील लाइफमध्ये पती आणि वडिलांची भूमिका साकारताना त्यांना स्टारडम कसे मिळाले याचा एक दृष्टीकोन हा बायोपिक देतो.
टिप्स इंडस्ट्रीज चे एम डी कुमार तौरानी चित्रपटाबद्दल बोलताना म्हणाले," मराठी चित्रपटसृष्टीत निलू फुले जी यांचे खुप मोठे योगदान आहे आणि हा चित्रपट त्यांच्यासाठी एक सन्मान आहे. आम्ही त्यांची मुलगी गार्गी फुले यांच्याकडून जीवन हक्क मिळवले आहेत आणि लवकरच चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात करणार आहोत."
निलू फुले यांची मुलगी गार्गी फुले म्हणाली, "प्रसादने माझ्या वडिलांसोबत बराच वेळ घालवला आहे आणि त्यांच्यावर चित्रपट बनवायला तो खूप उत्सुक होता.आम्हाला टिप्सकडून मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळाला आहे आणि आम्हाला त्यांच्या कथा सांगण्याच्या सामर्थ्यावर आणि क्षमतेवर विश्वास आहे."
फिल्म निर्माते मुख्य भूमिकेसाठी अभिनेत्याचा शोध घेत आहेत, तर अभिनेता-दिग्दर्शक प्रसाद ओक हे बायोपिक दिग्दर्शित करणार आहेत आणि ते किरण यज्ञोपवित यांनी लिहिले आहे.
प्रसाद ओक यांनी आम्हाला सांगितले की, " निलू फुले यांच्यासोबत काम करणे हा माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा अनुभव होता.आणि आता, त्यांच्यावर चित्रपट बनवता येणे ही सर्वात मोठी उपलब्धी आहे. तो माझ्यासाठी गुरूसारखा आहे आणि मला आशा आहे की प्रेक्षकांना सांगु शकेन कि तो किती चांगला होता."
दिलीप अडवाणी आणि नेहा शिंदे हे सर्जनशील निर्माते असून सहयोगी निर्माते आहेत अविनाश चाटे, अरिजीत बोरठाकूर आणि तन्नाज बंडुकवाला.
हा बायोपिक 2023 मध्ये सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.