आपल्या चपखल आणि कुशल अभिनयाने महाराष्ट्राच्या तमाम सिनेचाहत्यांच्या मनात हक्काची जागा बनवणारा प्रथमेश परब आता लवकरच डिलिव्हरी बॉइज या सिनेमाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नुकतेच या सिनेमाचे चित्रीकरण पूर्ण झाले असून, मोहसीन खान दिग्दर्शित 'डिलीव्हरी बॉइज' हा चित्रपट मराठी आणि हिंदी अशा दोन्ही भाषेमध्ये प्रदर्शित केला जाणार आहे. निर्माते डेविड नाडर यांच्या प्रोडक्शन वन या निर्मितीसंस्थेअंतर्गत हा सिनेमा लवकरच सिनेमागृहात प्रदर्शित होईल.
प्रथमेशने आपल्या सोशल मीडिया साइटवर एका सिनेमाबद्दल सूचित केले होते, तो हाच सिनेमा असून, मदर्स डे आणि डिलिव्हरी बॉईज यांचा खूप जवळचा संबंध असल्याचे प्रथमेश सांगतो.
दिग्दर्शक मोहसीन खान यांनी देखील आई या विषयावर डिलिव्हरी बॉईजची गोष्ट आधारित असल्याचे सांगत, प्रेक्षकांना तर्क वितर्क करण्यास भाग पाडले आहे. त्यामुळे डिलिव्हरी बॉईज मध्ये प्रथमेश आणि पृथ्वीकची जोडी काय करामत करणार हे पाहणे उत्सुकतेचे विषय ठरणार आहे.