सुबोध भावे होणार आता डोअरकीपर मोबाईल वाजणे थांबवणार

मंगळवार, 30 जुलै 2019 (09:24 IST)
नाटक सुरू असताना प्रेक्षकांचा मोबाइल फोन वाजून नाटकात अनेकदा व्यत्यत होतो तो आता येऊ नये यासाठी आता डोअरकीपरचं सुबोध भावे काम करणार. अश्रूंची झाली फुले’ या नाटकादरम्यान प्रेक्षकाच्या मोबाइलची रिंगटोन वाजल्यानंतर सुबोधने फेसबुक पोस्टच्या माध्यमातून त्याची नाराजी व्यक्त केली होती. प्रयोगा दरम्यान फोन वाजल्यास यापुढे नाटकात काम करणार नाही, अशी टोकाची भूमिकाही त्याने घेतली. 
 
”पण रंगभूमीने कलाकाराला इतक्या लवकर हार मानण्यास शिकवले नाही. त्यामुळे आता प्रयोग सुरू होण्यापूर्वी सहकलाकारांसोबत मिळून स्वत: डोअरकीपरचं काम करणार,” असं सुबोध स्पष्ट केले आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सुबोधने प्रेक्षकांना आवाहन केलं की, 
 
”नाटक हे फक्त नटांचं नसतं. नाटकातून मिळणारा आनंद हा तुमचा हक्क असतो. तो आनंद घेताना तुम्हाला मोबाइल फोन काही तासांकरिता बंद किंवा साइलेंटवर ठेवता आलं पाहिजे.” आजपासून सुबोध नाटक सुरू होण्यापूर्वी डोअरकीपर म्हणून रसिकांचे मोबाइल फोन बंद किंवा साइलेंट आहेत का हे तपासणार आणि मग नाटकाला सुरुवात करणार आहे. त्यामुळे आता मोबाईल जर वाजला तर सोबोध दिसेल.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती