'स्वीटी सातारकर' च्या ट्रेलरला प्रेक्षकांची चांगली पसंती

शनिवार, 22 फेब्रुवारी 2020 (09:19 IST)
'स्वीटी सातारकर' या  मराठी चित्रपटाचा ट्रेलर  लॉन्च झाला आहे. ट्रेलरला प्रेक्षकांची चांगली पसंतीही मिळत आहे. चित्रपटात खटकेबाज संवाद, जबरदस्त संगीत पाहायला मिळतंय. 'तू जेव्हा थैलीत होता ना तेव्हा मी पहिलीत होते', 'साडी बघायच्या वयात हा गाडी का बघतोय..' अशा खटकेबाज संवादांनी ट्रेलरमधून चित्रपट चांगलाच धम्माकेदार असण्याची चर्चा आहे.  चित्रपट येत्या  २८ फेब्रुवारीला  प्रदर्शित होणार आहे.
 
शब्बीर नाईक यांनी चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. तर मुनाफ नाईक, संतोष साबळे यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे. चित्रपटात अमृता देशमुख, संग्राम समेळ, विजय निकम, गौरी जाधव, वंदना वाकनीस, पुष्कर लोणारकर, विनम्र भाबल, प्रशांत विचारे अशी दमदार स्टारकास्ट आहे. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती