मराठी चित्रपटाच्या शुटिंगसाठी बिग बींनी आणले स्वत:चे कपडे

गुरूवार, 13 फेब्रुवारी 2020 (12:23 IST)
बॉलिवूड अभिनेता अमिताभ बच्चन हे केवळ अभिनयाचे शहंशाहच नव्हे तर खासगी जीवनात देखील महान व्यक्तिमत्तव आहे. ते लवकरच एका मराठी चित्रपटात झळकणार आहे ज्याचे नाव ‘एबी आणि सीडी’ आहे. या चित्रपटात अमिताभ यांच्यासोबत विक्रम गोखले दिसणार आहे. नुकतच या चित्रपटाचे पोस्टर देखील प्रदर्शित झाले. 
 
या चित्रपटासाठी अमिताभ बच्चन यांनी एका वेगळा निर्णय घेतल्याचा खुलासा चित्रपटाचे निर्माते अक्षय बर्दापूरकर यांनी केला. मराठी चित्रपटांचे बजेट कमी असल्यामुळे बिग बींनी चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी स्वत:च्या वार्डरोबमधील कपडे वापरले आहेत. अक्षया यांनी सांगितले की जेव्हा मी अमिताभजींना कपड्यांचे माप घेण्यासाठी डिझायनरला कधी पाठवायचे असे विचारले तेव्हा ते म्हणाले की मी चित्रपटासाठी स्वत:चे कपडे वापरेन. शूटिंगच्या दिवशी अमिताभजीं त्यांचे 20 जोडी कपडे व्हॅनिटी व्हॅनमध्ये घेऊन आले होते आणि त्यांनी टीमला भूमिकेप्रमाणे योग्य कपड्यांची निवड करण्यास सांगितले.
 
मिलिंद लेले दिग्दर्शित ‘एबी आणि सीडी’ या चित्रपटात सुबोध भावे, सायली संजीव, अक्षय टंकसाळे, शर्वरी लोहोकरे, नीना कुळकर्णी, लोकेश गुप्ते, सीमा देशमुख, सागर तळाशीकर यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. चित्रपट 13 मार्च रोजी प्रेक्षकांच्या भेटी येणार आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती