सिद्धयोगी मकरंद देशपांडे‘अल्याड पल्याड’ चित्रपटात दिसणार वेगळ्या भूमिकेत

सोमवार, 6 मे 2024 (16:13 IST)
मोजक्याच तरीही लक्षवेधी भूमिका करत रंगभूमी आणि रुपेरी पडद्यावर अभिनेता मकरंद देशपांडे यांनी आपल्या अभिनयाचा जबरदस्त ठसा उमटवला आहे. या  अवलिया कलाकाराने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे, त्यामुळे त्यांच्या नव्या भूमिकेविषयी रसिकांना कायमच उत्सुकता लागून राहिलेली असते. ‘

अल्याड पल्याड’ या आगामी मराठी चित्रपटाच्या निमित्ताने ते तंत्र-मंत्र यात पारंगत असलेल्या एका सिद्धयोगी साधूची भूमिका साकारताना दिसणार आहेत. एस.एम.पी प्रोडक्शन् अंतर्गत ‘अल्याड पल्याड' चित्रपट १४ जूनला प्रेक्षक भेटीला येणार आहे. या चित्रपटाची निर्मिती शैलेश जैन आणि महेश निंबाळकर यांनी केली असून दिग्दर्शन प्रीतम एस के पाटील यांचे आहे.    
 
आपला महाराष्ट्र हा विविधतेने नटलेला आहे. त्यात अनेक जुन्या संस्कृती, तसेच प्रथा, परंपरा आहेत. अशाच एका वेगळ्या परंपरेची आराधना करण्याची प्रथा असणाऱ्या दुर्गम भागातल्या एका गावाची, तिथल्या माणसांची रहस्यमय कथा असलेला  ‘अल्याड पल्याड’ हा थरारपट आहे.  
 
आव्हानात्मक भूमिका करायला मला नेहमीच आवडतात.‘अल्याड पल्याड’ मधली भूमिका एका मांत्रिकाची आहे, त्याला पूर्ण सिद्धी प्राप्त नाही,त्यातून तो त्या गावाला कसा वाचवणार? याची अतिशय थरार गोष्ट यात मांडलीय.   प्रेक्षकांना हा चित्रपट नक्कीच  खिळवून  ठेवेल यात शंका नाही असं मकरंद देशपांडे सांगतात.   
 
गौरव मोरे, सक्षम कुलकर्णी, सुरेश विश्वकर्मा, भाग्यम जैन, अनुष्का पिंपुटकर आदि कलाकारांच्या भूमिका‘अल्याड पल्याड' चित्रपटात आहेत. कथा प्रीतम एस के पाटील यांची असून पटकथा संवाद संजय नवगिरे यांचे आहेत. छायांकन योगेश कोळी यांचे तर संकलन सौमित्र धरसुलकर यांचे आहे.  वेशभूषा अपेक्षा गांधी तर ध्वनी स्वरूप जोशी  यांचे आहे. लाईन प्रोड्यूसर दिपक कुदळे पाटील आहेत.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती