अभिनेते क्षितिज झारापकर यांचे कर्करोगाने निधन

रविवार, 5 मे 2024 (16:55 IST)
मराठी कलाविश्वाचे प्रसिद्ध अभिनेते क्षितिज झारापकर यांचे कर्करोगाने वयाच्या 54 व्या वर्षी निधन झाले. आज सकाळी 10 वाजेच्या सुमारास त्यांनी एका खासगी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला.अनेक महिन्यापासून  ते कर्करोगाने ग्रस्त होते. त्यांचे मल्टिपल ऑर्गन डिसऑर्डर झाले आणि त्यांना हृदयविकाराचा झटका आला. 
 
क्षितिज हे उत्तम अभिनेते, लेखक आणि दिगदर्शक होते. त्यांनी एकुलती एक, आयडियाची कल्पना, ठेंगा, गोळाबेरीज , सक्खे शेजारी, या सिनेमांत काम केले. त्यांनी हा चर्चा तर होणारच या नाटकांत देखील आस्ताद काळे आणि अदिती सारंगधर यांच्या सोबत काम केले. आभाळमाया, दामिनी, बेधुंद मनाची लहर, घडलंय बिघडलंय, स्वराज्य रक्षक संभाजी,स्वराज्य जननी जिजामाता या मालिकांमध्येही त्यांनी काम केलं होतं. त्यांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात वेगळं स्थान निर्माण केलं होत. 

आज दुपारी 3:30 वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.त्यांच्या निधनामुळे मराठी सिनेविश्वात शोककळा पसरली आहे.  
 
Edited By- Priya Dixit  

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती