मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेता सुबोध भावेच्या घरात कोरोनाने शिरकाव केल्याचे समोर आले होते. त्यानंतर आता आणखीन काही मराठी कलाकारांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. बिग बॉस मराठीच्या सीझन 2 मधील स्पर्धक अभिजीत केळकर आणि तुला पाहते रे मालिकेतील अभिनेत्री पूर्णिमा डे यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे.