‘चक्रवर्ती सम्राट पृथ्वीराज चौहान’ मालिकेत रोनित रॉय राजा सोमेश्वरची भूमिका साकारणार

शुक्रवार, 14 फेब्रुवारी 2025 (12:01 IST)
‘चक्रवर्ती सम्राट पृथ्वीराज चौहान’ या आगामी ऐतिहासिक मालिकेच्या माध्यमातून सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजन धैर्य, नेतृत्त्व आणि वारशाची एक असामान्य कहाणी पडद्यावर जिवंत करणार आहे. या भव्य मालिकेत एक बाल राजा – पृथ्वीराज चौहान- पासून एक युवा, निरागस राजकुमार आणि मग शक्तिशाली योद्धा आणि आणि महान शासक बनण्यापर्यंतचा प्रवास उलगडण्यात येणार आहे. पृथ्वीराजाच्या जडणघडणीच्या वर्षांवर या मालिकेचा फोकस असेल. त्या काळात त्याच्या समोर असलेली आव्हाने आणि त्याने मिळवलेले विजय यामुळेच कसा एक महान शासक आकाराला आला, हे यात दाखवण्यात येईल.
 
या मालिकेत प्रसिद्ध अभिनेता रोनित रॉय पृथ्वीराज चौहानच्या पित्याची, सोमेश्वरची महत्त्वाची भूमिका करणार आहे, ज्याच्या मार्गदर्शनाखालीच त्याच्या पुत्राची महान शासक बनण्यासाठीची जडणघडण झाली होती. सोमेश्वर केवळ एक पिता बनून नाही, तर एक शिक्षक आणि संरक्षक बनून युवा पृथ्वीराजमधील प्रचंड क्षमता ओळखतो आणि त्याला राज्याची जबाबदारी सांभाळण्यासाठी तयार करतो. पृथ्वीराज मोठा होत असताना सोमेश्वर त्याची मार्गदर्शक ताकद बनतो आणि त्याच्यात शौर्य, सुजाणपणा आणि न्याया ही मूल्ये रुजवतो.
ALSO READ: समय रैनाला मुंबई पोलिसांनी चौकशीसाठी बोलावले; रणबीर इलाहाबादिया आणि आशिष चंचलानी यांना चौकशीसाठी समन्स जारी
या भूमिकेविषयी आपला उत्साह व्यक्त करताना रोनित रॉय म्हणतो, “चक्रवर्ती सम्राट पृथ्वीराज चौहान सारख्या अर्थपूर्ण आणि भव्य मालिकेचा भाग होताना मला खूपच आनंद होत आहे. मला पहिल्यापासून दमदार आणि बारकाईने लिहिलेली पात्रे करायला आवडतात. मला मनापासून असे वाटत आहे की टेलिव्हिजनवर मी साकारलेल्या इतर भूमिकांप्रमाणेच ही व्यक्तिरेखा आणि ही मालिका प्रेक्षकांच्या मनावर सखोल ठसा उमटवेल. ऐतिहासिक आणि सांस्कृतिक मूल्य लाभलेल्या या मालिकेत काम करणे ही माझ्यासाठी गौरवाची बाब आहे. या मालिकेत एक बाल राजा कसा घडत जातो, याचे सुंदर चित्रण आहे. या मालिकेत मी पृथ्वीराजाचा पिता सोमेश्वरची भूमिका करत आहे, ज्याची हुशारी, ताकद आणि मार्गदर्शन यांची एक महान राजा घडवण्यात खूप महत्त्वाची भूमिका होती.”
 
‘चक्रवर्ती सम्राट पृथ्वीराज चौहान’ ही मालिका लवकरच सुरू होणार आहे, सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजन आणि सोनी लिव्हवर!

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती