Radha Sagar: ' आई कुठे काय करते फेम अभिनेत्री गोंडस मुलाची आई झाली

रविवार, 10 सप्टेंबर 2023 (14:34 IST)
आई कुठे काय करते, सुंदर मनामध्ये भरली, फेम अभिनेत्री राधा सागर एका गोंडस मुलाची आई झाली असून तिने आज सकाळी ही गोड बातमी सोशल मीडियावर शेअर करून दिली आहे. आई कुठे काय करते मध्ये राधाची भूमिका साकारणारी अभिनेत्री राधा सागर खऱ्या आयुष्यात एका मुलाची आई झाली आहे. अभिनेत्रीने लेकाचा हात हातात घेत आपल्या बाळासाठी एक पोस्ट लिहिली आहे.
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Radha Sagar (@radhasagarofficial)

राधाच्या या पोस्टवर चाहते आणि कलाकार शुभेच्छांचा वर्षाव करत आहे. 
राधाच्या कारकिर्दीबद्दल बोलायचे तर राधाने अनेक चित्रपटात काम केले आहे. गेल्या नऊ वर्षांपासून ती अभिनयाच्या क्षेत्रात कार्यरत आहे. तिने काही दिवसांपूर्वी आपल्या गरोदर असल्याची गोड बातमी चाहत्यांना दिली असून अभिनयाच्या क्षेत्रातून ब्रेक देखील घेतला. आता अभिनेत्री एका गोंडस मुलाची आई झाली असून ती खूप आनंदात आहे. चाहते तिच्या पोस्टवर शुभेच्छा देत आहे. 
 
Edited by - Priya Dixit    
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती