मातृत्वाचा झरा बनून लाखो अनाथ लेकरांची आई झालेल्या सिंधुताई सपकाळ यांच्या जीवनावर आधारित ही मालिका सिंधुताई माझी माई-गोष्ट चिंधीचीअसणार असून लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेच्या माध्यमातून अभिनेत्री प्रिया बेर्डे (Priya Berde) तब्बल 7 वर्षांनी छोट्या पडद्यावर कमबॅक करत आहेत. सिंधुताई माझी माई-गोष्ट चिंधीची या मालिकेत अभिनेत्री प्रिया बेर्डे महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. या मालिकेत त्या पार्वती साठे यांच्या भूमिकेत दिसणार आहेत.