काटाकिर्ररची हीच टीम आपल्यासाठी गणपतीची स्तुती सांगणार एक गाणं घेऊन येत आहे. गणपती हा आपल्यासगळ्यांचा लाडका असून त्याच्या आगमनाची तयारी सुरु झाली आहे. "मोरया -तुझ्या नामाचा गजर" हे या गाण्याचे नावअसून नुकतंच या गाण्याचं रेकॉर्डिंग एन्झी स्टुडिओ येथे करण्यात आलं. "आदी तु अनंत तु तु गणनायका, शिवसुतागिरिजात्मजा तु गणनायका" असे या गाण्याचे बोल असून अमिताभ आर्य यांनी बोल लिहिले आहेत.
आशिष मोरे यांनी संगीतबद्ध केलेल्या या गाण्याचे गणेश सातार्डेकर संगीत संयोजन केले आहे. गणपतीची स्तुतीकरणाऱ्या गाण्यात आदर्श शिंदे यांच्यासोबत आनंदी जोशी यांचादेखील आवाज आपल्याला ऐकायला मिळणार आहे. "दुनियादारी", "डबल सीट", "पिंडदान", "नारबाची वाडी" यांसारख्या सिनेमातून आनंदी जोशींचा मंजुळ आवाज ऐकला आहे,तर आशिष मोरे यांनी शान, कुणाल गांजावाला, जावेद अली, सुरेश वाडकर, अमृता फडणवीस यांसारख्या दिग्गजगायकांबरोबर काम केले आहे. आशिष मोरे यांचा "एक आमचा बाणा" हे महाराष्ट्राचं गौरवगीत असलेला गाणं नुकताचप्रदर्शित झालं असून प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद या गाण्याला मिळाला आहे. गणेशाची स्तुती करणारं आदर्श- आनंदीच्यास्वरातील हे गाणं लवकरचं प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.